मोहन भागवतांना ध्वजारोहण करण्यापासून रोखणा-या जिल्हाधिका-यांची बदली
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखणा-या जिल्हाधिका-याची बदली करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखणा-या जिल्हाधिका-यांची बदली करण्यात आली आहे.
केरळमधील पल्लकड येथे सरसंघचालक मोहन भागवत हे एका शाळेत ध्वजारोहण करण्यासाठी दाखल झाले. मात्र, जिल्हाधिकारी पी. मेरीकुथी यांनी आदेश दिले होते की, कुठलीही राजकीय व्यक्ती शाळेत ध्वजारोहण करु शकत नाही.
जिल्हाधिका-यांनी असा आदेश दिला असतानाही मोहन भागवत यांनी ध्वजारोहण केलं. या घटनेनंतर आता जिल्हाधिकारी पी. मेरीकुथी यांची बदली करण्यात आली आहे. मोहन भागवत यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखल्याने वादही निर्माण झाला होता.
जिल्हाधिका-यांची बदली झाल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर केरळ सरकारने स्पष्टीकरण देत म्हटलं की, ही एक रूटीन ट्रान्सफर आहे. केवळ त्यांचीच नाही तर इतरही चार जिल्हाधिका-यांची बदली करण्यात आली आहे.