पॅनकार्ड-आधार लिंक करण्यासाठी भरावा लागणार मोठा दंड
तुम्ही अजूनही पॅन-आधार लिंक केलं नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची
मुंबई : तुम्ही अजूनही आधार कार्ड पॅनसोबत लिंक केलं नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पॅनकार्ड आधारशी लिंक न करणाऱ्यांना आता मोठा दंड भरावा लागणार आहे. याआधी 500 रुपये दंड आकारला जात होता. मात्र ही रक्कम वाढवण्यात आली आहे.
पॅनकार्ड-आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत 30 जून देण्यात आली होती. त्यावेळी लिंक न केलेल्या लोकांना 500 रुपये दंड आकारला जात होता. आता ही रक्कम 1 जुलैपासून वाढवण्यात आली आहे. आता एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
तुम्हाला जर अजूनही पॅनकार्ड आधारशी लिंक करायचं असेल तर तुम्ही करू शकता मात्र हा दंड भरावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला incometax.gov.in/iec साईटवर भेट द्यावी लागेल. तिथे लिंक आधारवर क्लीक करा. त्यानंतर आधारकार्डचे डिटेल्स लिहा. PAN is linked to Aadhaar Number हे तुम्हाला दिसेल.
जर तुमचं आधारकार्ड पॅनशी लिंक नसेल तर तुम्हाला incometaxindiaefiling.gov.in/home या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तिथे लिंक आधारकार्डचा पर्याय निवडा. त्यानंतर डिटेल्स भरा. तिथे तुमचं आधारकार्ड-पॅनशी लिंक होईल.
आता तुम्हाला जर दंड भरायचा असेल तर तुम्हाला https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp या साईटवर भेट द्यायची आहे. तिथे तुम्हाला आधार-पॅनसाठी रिक्वेस्ट करायची आहे. CHALLAN NO./ITNS 280 हा पर्याय निवडा. पुढे प्रोसेस केली की Tax Applicable असं म्हणा. तुम्हाला पेमेंटची कोणती सुविधा निवडायची ते निश्चित करा त्यानंतर तुमचे डिटेल्स अपलोड केल्यावर पेमेंट होईल.