नवी दिल्ली : तुम्ही जर अजूनही आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक केले नसतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. अर्थ मंत्रालयाने लोकांना आपलं पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुरुवातीला १ जुलैपर्यंत मुदत होती पण आता ३१ ऑगस्टपर्यंत ती मुदत वाढवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत पॅनला आधार कार्डशी लिंक करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा पॅन कार्ड रद्द होऊ शकतं. पॅन कार्ड आणि आधार लिंक नसेल तर इनकम टॅक्स रिटर्न देखील भरता नाही येणार आहे. टॅक्स चोरी थांबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.


केंद्र सरकारने १ जुलैपासून इनकम टॅक्स रिटर्न फाईल करन्याची मुदत वाढवली होती. ३१ जुलै इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


लिंक : https://incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/LinkAadhaarPrelogin.html