मुंबई : पॅनकार्ड हा सर्वाच महत्वाचा डॉक्यूमेंट मानला जातो. हा डॉक्यूमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला कोणतेही सरकारी किंवा सरकारी कामांशी निगडित गोष्टींमध्ये बाधा येऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही पॅनकार्ड बनवले नसेल. तर तुम्ही लगेचेच हा डॉक्यूमेंट बनवू शकता. त्याला फक्त 10 मिनिटं तुम्हाला वेळ द्यावा लागेल. कारण ही ऑनलाईन प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आली आहे. आता इनकम टॅक्सच्या वेबसाईटमध्ये ही बदल करण्यात आले आहे, ज्यामुळे आता पॅनकार्ड काढण्याची पद्धतही बदली आहे. जी अगदी सोपी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर जाणून घ्या या नव्या वेबसाईटवरुन तुम्ही कशा प्रकारे पॅनकार्ड काढू शकता ते...


1. सर्व प्रथम Incometax.gov.in वर जा.
2. यानंतर, होम पेजवरील  Our Services पर्यायावर या आणि तेथे See More वर क्लिक करा.
3. यानंतर तुमच्या समोर Instant E-Pan चा पर्याय येतो. तेथून आपण इन्स्टंट पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता.
4. नवीन पॅनकार्ड मिळविण्यासाठी Get New-ePIN वर क्लिक करा.
5. यानंतर, तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल, जो तुम्हाला त्यात टाकावा आणि Continue पर्यायावर क्लिक करा.
6. त्यानंतर वेरिफिकेशन होईल आणि तुमच्या आधारशी जोडलेल्या फोन नंबरवर ओटीपी पाठवला जाईल.
7. त्यानंतर तुम्हाला ओटीपी भरावा लागेल आणि त्याला कंफर्म करावे लागेल.
8. याला कंफर्म केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डशी संबंधित माहिती वेबसाइटवर दिसेल.
9. यानंतर, तुम्हाल आयडी इत्यादीची पडताळणी करावी लागेल आणि ओके करावे लागेल.


पॅन कार्ड डाऊनलोड करण्याची ही प्रक्रिया


1. यानंतर तुम्ही वेबसाईटच्या होम पेजवर जा. येथे पुन्हा Our Servicesपर्यायावर जा आणि तेथे See Moreवर क्लिक करा.
2. त्यानंतर Instant E-Pan वर क्लिक करा आणि चेक स्टेटसच्या लिंकवर क्लिक करा.
3. यानंतर, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक विचारला जाईल, जो त्यामध्ये टाका
4. यानंतर तुम्हाला ओटीपी मिळेल, तो प्रविष्ट करा.
5. मग तुम्हाला तुमचे पॅन कार्ड दिसेल, जे तुम्ही डाऊनलोड करू शकता.
6. हे E-Pan सर्वत्र वैध आहे.