अहमदाबाद : सोशल मीडियावरून कधी काय मनस्ताप होईल सांगता येत नाही. असाच मनस्ताप सध्या अहमदाबादेतल्या पांचाल कुटुंबियांना सहन करावा लागतोय... त्याचं झालं असं की, ११ वर्षांपूर्वी काढलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय... कल्पित भचेच यांनी १२ सप्टेंबर २००७ रोजी मनीलाल गांधी वृद्धाश्रमात काढलेला हा फोटो... वृद्धाश्रमात राहणाऱ्या दमयंती पांचाल आणि त्यांची लहानगी नात भक्ती यांचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भक्तीच्या शाळेतल्या मुलांना वृद्धाश्रमात नेलं असताना, नेमकी तिथं तिची आजी दमयंती भेटली... तेव्हा आजी आणि नाती या दोघींनाही अश्रू अनावर झाले. त्या छायाचित्राला उत्कृष्ट छायाचित्राचा पुरस्कारही मिळाला होता. आता हा फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर झाला आणि भक्तीच्या कुटुंबीयांवर टीकेची झोड उठली. मात्र या फोटोमागचं सत्य काही वेगळंच आहे. आजोबांच्या निधनानंतर आजी दमयंती यांनी स्वतःहून वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला होता, असं वास्तव आता समोर आलंय.