Panipuri Viral Video in Marathi: तिखट अन् चटपटीत पाणी...  एवढं म्हटलं तरी डोळ्यासमोर पाणीपुरी येते. रस्त्यांच्या कडेला असणारे चाटचे ठेले आणि त्या चाटची चटकदार चव...कुणाला आवडणार नाही...ही पाणीपुरी अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना चाट आवडतात. पाणीपुरीसोबत रगडा पुरी, दहीपुरी, शेवपुरी, भेळ सगळ्यांना आवडतेच पण पाणीपुरी सगळ्यांना विशेष आवडते. जसे पाणीपुरीचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला खाल्ली तसचं सोनं आणि चांदीच पाणीपुरी तुम्ही कधी खाल्ली का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीमध्ये गोलगप्पे, महाराष्ट्रात पाणीपुरी, बंगालमध्ये पुचका असे चटकदार पाणीपुराला संबोधले जाते. पण सोशल मीडियावर सध्या गुजरातमधली सोनं आणि चांदीची असणारी पाणीपुरी व्हायरल होत आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील एका विक्रेत्याने पाणीपुरीची आणखी एक नवीन प्रकार शोधून काढला आहे. या पाणीपुरीमध्ये सुका मेवा आणि थंडाईचा समावेश करण्यात आला असून ही पाणीपुरी सोनेरी प्लेटमध्ये दिली जातं आहे. तसेच पाणीपुरीवर सोने आणि चांदीच्या कोटींग करुन सर्व्हे केली जाते. सध्या दिवसभर पाणीपुरीची चर्चा सुरू आहे. काही लोक या पाणीपुरीचे कौतुक करताय तर काही लोकांनी नाराजी पसरवली आहे. 


या व्हायरल व्हिडिओंमध्ये तुम्ही पाहू शकता की, युट्युबर व्लॉगर्स खुशबू आणि मनन याने वेगप्रकारच्या नवीन पाणीपुरी विषयी माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे - पाणीपुरीमध्ये बदाम, काजू आणि पिस्ता टाकताना दिसत आहे. त्यानंतर त्यात मधही टाकत आहे.  शेवटी, ग्लासमध्ये थंडाई टाकतात आणि प्रत्येक पाणी पुरीला सोन्या आणि चांदीची कोंटिग करतात आणि ही पाणीपुरी सोनेरी ताटात सर्व्हे करताना दिसत आहे. या पाणीपुरीला शेअरइट असे नाव देण्यात आले आहे. सध्या ही पाणीपुरी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 



हा व्हिडीओ cherishing_the_taste_या पेजवरुन इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला सोने-चांदीची पाणीपुरी, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.  "ShareIt ही देशातील पहिली स्वच्छ लाहव्ह तळलेली पाणीपुरी आहे." अनेक युजर्सनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, “आम्ही ते लोक आहोत जे दहा रुपयांत चार पाणीपुरी खातो. एका युजरने लिहिले, “याला बप्पी लहरी पाणी पुरी म्हणा” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “भाव, किंमत पण सांग” अनेक युजरना पाणी पुरीचा हा प्रकार आवडला नाही.