`पतली कमरिया तेरी, हाय हाय हाय...` जवानांची अशी परेड तुम्ही कधीच पाहिली नसेल, Video व्हायरल
`ढल गया दिन` नंतर आता `पतली कमरियावर` जवानांची परेड, हा Video पाहून तुम्हीही कराल कौतुक
Viral video : सोशल मीडियावर (Social Media) सध्या जवानांच्या परेडचा (Parade of Soldiers) एक व्हिडिओ (Video) वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत भारतीय सैन्यातील (Indian Army) जवान हिंदी चित्रपटातील गाण्यावर परेड (Pared on Bollywood Song) करताना दिसत आहेत. गाण्यावर अगदी तालबद्ध परेड करणाऱ्या या जवानांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Vidoe Viral) होतोय. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जवानांची जोरदार तयारी (Republic Day Parade) सुरु आहे. दरवर्षी जवानांची परेड, साहसी स्टंट आणि भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारे चित्ररथ हे आकर्षणाचं केंद्रबिंदू असतात.
जवनांच्या रंगीत तालिमेचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. यातलाच एक व्हिडिओ सघ्या इंटरनेटवर (Internet) व्हायरल होत आहे. या व्हिडिओत भारतीय जवान हिंदी चित्रपटातील गाण्यावर परेड करताना दिसत आहेत. कडाक्याच्या थंडीत हे जवान परेड करताना दिसत आहेत. हिंदी गाण्यांवर परेड करणं ही पहिलीच वेळ नाहीए, याआधीही असे व्हिडिओ आपण पाहिले असतील. वास्तविक हिंदी गाण्यांवर परेड करणं हा सैन्याच्या कार्यक्रमाचा हिस्सा नाही किंवा मुख्य कार्यक्रमातही याचा वापर केला जात नाही. कडाक्याच्या थंडीत जवानांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारचे प्रयोग केले जातात.
हे ही वाचा : भारतात येणार कॅन्सरसारख्या आजाराची त्सुनामी, कारण... धक्कादायक अहवाल
व्हायरल व्हिडिओत काय आहे?
सध्या सोशल मीडियावल व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत काही जवान परेड करताना दिसत आहेत. त्यांना मार्गदर्शन करणारा अधिकारी 'पतली कमरिया तेरी, तिरछी नजरीया तेरी' या गाण्याची ओळ म्हणतो, त्यानंतर परेड करणारे जवान 'हाय हाय हाय' असा कोरस देतात. त्यानंतर 'ढल गया दिन' या गाण्यावरही हे जवान परेड करताना दिसत आहेत.
थंडीत जवानांचा आवाज आणि परेडदरम्यान त्यांचं शरीरात उर्जा निर्माण व्हावी यासाठी अशी गाणी गायली जातात. उत्तर भारतात सध्या कमालीची थंडी आहे. तापमान 6 ते 7 डिग्रीपर्यंत खाली गेलं आहे. त्यामुळे जवानांचा उत्साह टिकवण्यासाठी असा प्रयोग केला जातो. तसंच प्रजासत्ताक दिनाआधी जवान दीड ते दोन महिने एकाच बँडवर तयारी करत असतात. यातून थोडासा ब्रेक मिळावा हे देखील यामागे एक कारम असतं.