नवी दिल्ली : अभिनेत्री परिणीती चोप्रा हिला एक चांगली संधी मिळाली आहे. तसेच, भारतीय महिलांसाठीही एक आनंदाची बातमी आहे. परिणीती चोप्रा ही आता ऑस्ट्रेलियाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून झळकणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टूरिज्म ऑस्ट्रेलियाने (टीए) दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया पर्यटन व्यवसायात वाढ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचे काऊन्सिलर जनरल टोनी ह्यूबर यांनी म्हटले आहे की, परिणीतीला 'फ्रेंड ऑफ ऑस्ट्रेलिया' (एफओआय) बनविण्यात आले आहे. परिणीती ही एफओआय पॅनलचा घटक बनलेली पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. या आगोदर सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर आणि क्रिकेट कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी ही भूमिका निभावली आहे.


आपल्या नव्या जबाबदारी आणि संधीबाबत बोलताना, 'मला फ्रेंड ऑफ ऑस्ट्रेलिया' म्हणून निवडल्याबद्धल प्रचंड आनंद झाला आहे. सुट्टी साजरी करण्यासाठी ऑस्ट्रेलिया हे माझ्यासाठी एक अत्यंत आवडते आणि महत्त्वाचे ठिकाण राहिले आहे. मी गेल्याच वर्षी या देशात सुट्टी साजरी करण्यासाठी गेले होते. आता तर मला ऑस्ट्रेलिया समजून घेण्याची संधी मिळत आहे, अशी प्रतिक्रीया परिणीतीने दिली आहे.