Zomato Delivery Boy ला न्याय मिळवून देण्यासाठी Parineeti Chopra सरसावली, म्हणाली....
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रानेही या प्रकरणावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिने 14 मार्च रोजी झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या बाजूने ट्विट केले आहे.
मुंबई : झोमॅटो प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून लोक सोशल मीडियावर आपले मत मांडत आहेत. कोण चूक. कोण बरोबर? याचाच सगळे विचार करत आहेत. पण आता तर बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रानेही या प्रकरणावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिने 14 मार्च रोजी झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या बाजूने ट्विट केले आहे.
परिणीतीचे ट्विट
डिलिव्हरी बॉयवर हल्ला केल्याचा आरोप करत परिणीती चोप्राने ट्विट करून लिहिले, "झोमेटो इंडिया, कृपया या गोष्टीचे सत्य तपासा आणि याचा जोही निकाल येईल, तो जाहीरपणे आम्हाला सांगावा. जर तो व्यक्ती निर्दोष असेल (तो आहेच असा मला विश्वास आहे) तर कृपया आम्हाला त्या महिलेल्या शिक्षा करण्यास मदत करा.
हे प्रकरण अमानुष, लाजिरवाणे आणि हृदयपिळवटून टाकणारे आहे. मी यामध्ये काय आणि कशी मदत करु शकते? ते मला सांगा." परिणीतीचा हा ट्विट खूपच व्हायरल होत आहे आणि लोक तिचे कौतुक करत आहेत. परिणीतीच्या या ट्विट नंतर आता लोक सुद्ध त्या डिलिव्हरी बॉयच्या बाजूने आपली मत मांडू लागले आहेत.
हितेशा चंद्राणीचा व्हिडिओ
ही संपूर्ण घटना गेल्या मंगळवारी घडली आहे. पेशाने मॉडेल आणि मेकअप आर्टिस्ट असलेली हितेशा चंद्रानी ही ने झोमॅटोहून जेवणाची ऑर्डर दिली होती. पण तिची ऑर्डर वेळेवर आली नाही, त्यामुळे तिला जेवणाला उशीर झाला. तेव्हा तिने झोमेटो इंडियाच्या कस्टमर केअरला फोन लावला आणि ऑर्डरला उशीर झाल्यामुळे ऑर्डर रद्द करण्यास सांगितले.
याच संभाषणादरम्यान झोमॅटो डिलिव्हरी बॉय कामराज तिथे आला. हितेशाने त्याला जेवण परत घेऊन जायला सांगितले, तेव्हा तो तिच्यावर ओरडला तो म्हणाला की, तो गुलाम आहे का? जो विनाकारण अशी धावपळ करेल.
जेव्हा हितेशाला तिच्या घराचा दरवाजा बंद करत होती, तेव्हा कामराज (डिलिव्हरी बॉय) जबरदस्ती आत घुसला आणि ते जेवणाचं पाकीट सुद्धा परत नेण्यास नकार दिला आणि तेव्हाच रागात कामराजने हितेशा चंद्रानीच्या चेहऱ्यावर त्याने पंच मारला.
हितेशा जोरजोरात ओरडू लागली, तेव्हा कामराज तेथून पळून गेला. हितेशाच्या नाकाच्या हाडाला फ्रॅक्चर झाले आहे. हे सरळ हितेशा आपल्या व्हिडिओत म्हटलं आहे आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर देखील केला. या व्हिडिओवरुन डिलिव्हरी बॉयला बेंगळुरू पोलिसांकडून अटक करण्यात आले आहे.
डिलिव्हरी बॉय कामराजची बाजू
एएनआय (ANI)या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, कामराजने त्याच्यावर लावलेले सगळे आरोप फेटाळले "ऑर्डर घेतल्यानंतर त्या महिलेने तिला पैसे देण्यास नकार दिला, कारण मला उशीर झाला होता. तिला ते फुकटात घ्यायचं होतं. तिने मला चपलीने मारायला सुरुवात केली.
मी त्यात स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचाच हात तिच्या नाकावर लागला आणि तिने हातात अंगठी घातली होती तिच तिला लागली."
पुढे कामराज म्हणाला, "मला हे अधिक गुंतागुंतीचं बनवायचं नाही आहे. मला विश्वास आहे की सत्यचं जिंकेल. नाही तर मी कायदेशीररित्या लढेन. माझी आई आहे, माझे वडील १५ वर्षांपूर्वी वारले, मी माझ्या कुटुंबातला एकमेव कमावताआहे. गेल्या २६ महिन्यांपासून मी झोमॅटोमध्ये ४.७ रेटिंग घेऊन काम करतोय. खटला पूर्ण होईपर्यंत कंपनीने माझा आयडी ब्लॉक केला आहे आणि खटला निकाली काढल्यानंतर खटला मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे."