नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरु होणार असल्याचं आज जाहीर करण्यात आलं. अधिवेशन 13 ऑगस्ट पर्यंत चालणार असून यात 19 दिवसांचं कामकाज होणार असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने १९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती. या अधिवेशनात, सरकार अनेक बिलं सादर करु शकते. दुसरीकडे विरोधही अनेक विषयांवर सरकारला घेरण्यासाठी प्रयत्न करतील. उत्तप्रदेशमध्ये झालेला हिंसाचार, देशातील कोरोना स्थिती, कोरोना लसीकरण या मुद्द्यांबरोबरच कृषी कायदे रद्द करण्याची मागणी संसदेत पुन्हा होऊ शकते. 


अधिवेशनात कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचं पालन करणं अनिवार्य असेल. संसदेत प्रवेश करणाऱ्या सर्वांनी कोरोना लसीचा किमान एक डोस घेतला असणं आवश्यक आहे. तसंच संसदेत खासदारांसाठी सुरक्षित अंतर राखून आसनव्यवस्था ठेवण्यात करण्यात येईल.