पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोवा इथल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात भरती करण्यात आलंय. पर्रिकरांना अशक्तपणा जाणवत असल्याचं बोललं जातंय. तसंच त्यांचा रक्तदाबही कमी झालाय. 


मात्र पर्रिकरांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलंय. 


याआधीही प्रकृती अस्वास्थामुळे पर्रिकरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोटात दुखू लागल्याने मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते.