नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ पवार हे खालापूर तालुक्यात प्रचार दौऱ्यात असताना मंदिरात सुरू असलेल्या भजनात रमले. खालापूर तालुक्यात प्रचार दौरा सुरू असताना नावंडे गावात गणपती मंदिरात भजन सुरू होते. त्यावेळी पार्थ पवार हे त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी गेले. पण मंदिरात भजन सुरू असल्याचे पाहताच पार्थ पवार हे त्या मंदिरात गेले. आणि टाळ हातात घेत त्यांनी देखील भजनाचा आनंद घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आचारसंहिता चालू झाल्या पासून सर्व पक्ष प्रचारासाठी अनेक शक्कली लढवताना दिसत आहे. एकीकडे अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने गुढीपाडव्याचे औचित्य साधत लेझीमवर ताल धरला. तर दुसरीकडे पार्थ पवार मतदारांना आकर्षीत करण्यासाठी चक्क भजनात रमलेले दिसत आहेत. 


याआधी इस्कॉन मंदिराच्या रथयात्रेत पार्थ पवार सहभागी झाले होते. त्यावेळेस त्यांनी हरे राम हरे कृष्णावर ठेका धरला होता. निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी चक्क रस्त्यावर ठेका धरला आणि रथ यात्रेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी सुद्धा पार्थ पवार यांच्या सोबत हरे राम हरे कृष्णावर ठेका धरला होता.


पाडव्याच्या मुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला खास सोन्याचे उपरणे 


पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती साठी खास सोन्याचे उपरणे तयार करण्यात आले आहे. ट्रस्ट कडे दान आलेल्या सोन्या मधून हे उपरणं घडविण्यात आले आहे. हाताने तयार करण्यात आलेल्या या उपरण्याच वजन तब्बल साडे तीन किलो असून अठराशे खडे यावर लावण्यात आले आहेत. जे बनविण्यासाठी पाच कारागिरांना सहा महिन्यांचा कालावधी लागला. आज पाडव्याच्या मुहूर्तावर ते बाप्पाला अर्पण केले गेले.