प्रवाशाने Air Hostess सोबत असं काय केलं, ज्याची सोशल मीडियावर होतेय चर्चा
Air Hostess सोबत प्रवाशाने केलेली `ही` गोष्ट तुमच्या सोबत कधी झाली आहे?
Air Hostess and Passenger In Flight: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण त्यातील काही व्हिडीओ असे असतात ज्यांची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलेली असते. आता देखील इंटरनेटवर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेक वेळा प्रवाशांमध्ये भांडण झाल्याच्या घटना घडतात, तर कधी विमानामधील अन्य गोष्ट सोशल मीडियाच्या मध्यमातून जगभरात व्हायरल होत असतात. आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये प्रवाशाने महिला Air Hostess सोबत जे केलं, ते पाहून ती देखील प्रचंड आनंदी झाली.
व्हिडीओमध्ये एक एअर होस्टेस लोकांना खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी आणि त्यांना सर्व्ह करण्यासाठी प्रवाशांना त्यांच्या जागेवर जावून विचारत असते. दरम्यान, एक स्केच आर्टिस्ट बसलेल्या ठिकाणी एअर होस्टेस पोहोचली.
तेव्हा स्केच आर्टिस्टने Air Hostess चं काढलेलं चित्र तिला दाखवलं. स्वतःचं चित्र पाहिल्यानंतर ती Air Hostess प्रचंड आनंदी झाली. सध्या Air Hostess आणि आर्टिस्टचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आर्टिस्ट एअर होस्टेसच्या जवळ पोहोचताच त्याला वाटले की हा प्रवासी काही कामासाठी आला असावा, पण त्याने हातातले पान दाखवताच एअर होस्टेस आनंदाने ओरडली. ती खूश झाली आणि त्याऐवजी एअर होस्टेसने त्या कलाकाराला धन्यवाद कार्ड दिले आणि त्यावर काही शब्द देखील लिहिले.