मुंबई : बंगलुरूवरून दिल्लीला येणाऱ्या एअर एशियाच्या फ्लाइट (Air Asia Flight) मध्ये एक अत्यंत लाजीरवाणा प्रकार घडला आहे. विमानात प्रवासादरम्यान क्रू मेंबर्ससोबत वाद झाल्यामुळे एका प्रवाशाने चक्क आपले कपडेच काढले आहेत. (Passenger strips naked in Flight) ही घटना मंगळवारी घडलेली असून एअर एशिया फ्लाइट क्रमांक l5-722 मधून एक युवक बंगलुरूवरून दिल्लीला जात होता. 


लाइफ जॅकेटवरून क्रू-मेंबर्ससोबत झाला वाद 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्लाइटमध्ये असलेल्या एका प्रवाशाना एएनआयला सांगितलं की,'सर्वात अगोदर प्रवाशाने लाइफ जॅकेटवरून केबिन क्रूसोबत वाद निर्माण केला. खूप बेशिस्तपणे त्यांच्याशी बोलू लागला. यानंतर विमानात असलेल्या सगळ्या स्टाफने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दरम्यान त्याने आपले कपडे काढायला सुरूवात केली. धक्कादायक बाब म्हणजे एका पाठोपाठ तो सगळे कपडे काढू लागला.'


विमान कंपनीच्या प्रवक्त्याने दिली माहिती 


एअर एशियाच्या एका क्रू मेंबरने विमानात असलेल्या इतर प्रवाशांच्या मदतीने गैरवर्तणूक करणाऱ्या प्रवाशाला रोखलं. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पायलटला दिली. यानंतर पायलटने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दिल्ली एअर ट्रॅफि कंट्रोलर (ATC) ला संपूर्ण घटना सांगितली आणि विमान लँडिंगची परवानगी घेतली. लँडिंगच्या अगदी लगेच प्रवाशाला सीआयएसएफ (CISE) ने पोलिसांच्या ताब्यात दिलं. 


एअर एशिया इंडियाच्या प्रवक्ताने दिलेल्या माहितीनुसार, 6 एप्रिल 2021 रोजी बंगलुरू ते दिल्लीला जाणाऱ्या विमानात एका प्रवाशाने गैरवर्तणूक केलं आहे.