Online Passport Apply: परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट (Passport) आणि व्हिसा (VISA) ही दोन महत्त्वाची कागदपत्रं आहेत. पण पासपोर्ट काढताना पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटची प्रक्रिया अनेकांना किचकट वाटते. पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटमुळे अनपेक्षितपणे यंत्रणेवर ताण येतो. यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. 28 सप्टेंबर 2022 पासून पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) सेवांसाठीचे अर्ज देशभरातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर (POPSKs) उपलब्ध होतील. त्यामुळे पासपोर्ट बनवणं सोपे होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून (Foreign Ministry) एक निवेदन देण्यात आले आहेत. ज्यामध्ये असे म्हटले आहे की मंत्रालय पासपोर्ट संबंधित सेवा सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांचा अनुभव सुधारण्यासाठी काम करत आहे. पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (Police Clear Certificate) ची मागणी वाढली आहे. यासाठी, आता भारतातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये पीसीसी सेवांसाठी अर्ज करण्याची सुविधा असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजे काय?


भारतीय पासपोर्ट धारकाला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) जारी केले जाते. निवासी स्थिती, नोकरी किंवा दीर्घ कालावधीसाठी व्हिसा मिळवायचा असेल तर पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट आवश्यक आहे. पण टुरिस्ट व्हिसावर (Tourist VISA) परदेशात जाण्यासाठी पीसीसीची आवश्यकता नसते.



मंत्रालयाने म्हटले आहे की, या निर्णयानंतर केवळ परदेशात नोकरी शोधणाऱ्या भारतीय नागरिकांचीच नाही तर पीसीसीच्या इतर गरजांचीही पूर्तता केली जाईल. जसे की शिक्षणाच्या बाबतीत, दीर्घकाळासाठी व्हिसा इत्यादी.


आवश्यक कागदपत्रे


1. सध्याच्या पत्त्याचा पुरावा
2. परदेशी नियोक्त्यासोबत रोजगार कराराची स्वयं-साक्षांकित प्रत
3. अधिकृत इंग्रजी भाषांतराच्या सात वैध व्हिसाची प्रत (व्हिसा इंग्रजीत नसल्यास)
4. ईसीआर/नॉन-ईसीआरची स्वयं-साक्षांकित छायाप्रत