नवी दिल्ली : कोरोनाची लाट आता कमी झाली आहे. अशातच तुम्ही परदेशात फिरायला जाण्याचे नियोजन करीत असाल तर, तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. परदेशी जाण्यासाठी तुमच्याकडे पासपोर्ट असणे गरजेचे आहे. अशातच तुमच्या पासपोर्टची वैधता संपणार असेल तर पुढील सोप्या टिप्स फॉलो करून पासपोर्ट रिन्यू करू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेप टू स्टेप प्रोसेस


स्टेप 1 फॉर्म भरणे
- सर्वात आधी पासपोर्ट सेवेच्या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन लॉगइन करा.
- अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट/ रिन्यू ऑफ पासपोर्टच्या लिंकवर क्लिक करा
- त्यानंतर अल्टरनेटिव्ह वन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज खुले होईल.
- तुम्हाला इच्छा असेल तर ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही डाऊनलोड देखील करू शकता.
- त्यानंतर वेबसाईटवर अपलोड करू शकता. 
- ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी Fill application form Online वर क्लिक करा


स्टेप 2 अपॉइंटमेंट घेणे गरजेचे 
- ऑनलाईन फॉर्मच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आवश्यक माहिती भरून सबमिट करा
- यानंतर लॉगइन करून पहिल्या पेजवर जाऊन सबमिट एप्लिकेशनवर क्लिक करा
- यानंतर पेमेंट करण्यासाठी रेडिओ बटनावर क्लिक करा
- Pay and Schedule Appoinment च्या पर्यायावर क्लिक करा.
- तसेच ऑनलाईन पेमेंट सिलेक्ट करून पुढे जा 
- पासपोर्ट ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी ऑनलाईन  पेमेंट करणे गरजेचे आहे.



स्टेप 3 अशी घ्या अपॉइंटमेंट
- यानंतर आपल्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रांची यादी आपल्या स्क्रिनवर येईल
- यामध्ये आपल्या सुविधेनुसार अपॉइंटमेंटची तारीख आणि वेळ निवडा
- तसेच पेमेंट पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा पासपोर्ट सेवेच्या वेबसाईटवर जा
- एप्लिकेशनची प्रिंट काढा


स्टेप 4
- पासपोर्ट ऑफिसमध्ये जाते वेळी प्रिंट केलेली रिसिप्ट घेऊन जा
- फोटो सह तेथे सर्व कागदपत्र सबमिट करा


स्टेप 5 
- त्यानंतर तुम्हाला एक स्लिप मिळेल ज्यामाध्यमातून तुम्ही पासपोर्टचे स्टेटस ट्रॅक करू शकता.
- पोलीस व्हेरिफिकेशन नंतर एका आठवड्यात पासपोर्ट पोस्टच्या माध्यमातून तुमच्या घरी पोहचेल.
- जूना पासपोर्ट पासपोर्ट ऑफिसमध्ये जमा करा