ना कार्ड, ना कॅश… आता फास्टॅगने ही पॅट्रोल भरता येणं शक्य... पण कसं? लगेच माहित करुन घ्या
इंडियनऑईलच्या पुल स्टेशनवर पूर्णपणे डिजिटल सुविधा घेऊ शकतात. यामुळे ग्राहकांचा आता वेळ वाचणार आहे.
मुंबई : इंडियन ऑईल आणि आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) ग्राहकांना विशेष सुविधा देण्यासाठी एकमेकांशी हातमिळवणी करत आहे. त्यामुळे आता आपण सर्व इंडियन ऑईल पेट्रोल पंपांवर कॉन्टॅक्टलेस आणि कॅशलेस पेमेंट करण्यास सक्षम असणार आहे. आयसीआयसीआय बँक फास्टॅग वापरकर्ते आता इंडियनऑईलच्या पुल स्टेशनवर पूर्णपणे डिजिटल सुविधा घेऊ शकतात. यामुळे ग्राहकांचा आता वेळ वाचणार आहे.
आयसीआयसीआय बँक फास्टॅगचा वापर करणारे ग्राहक फास्टॅगच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेल भरण्यास सक्षम असतील. हे इंडियन ऑईलच्या ऑटॉमेशन सिस्टममध्ये एकत्रित केले आहे. हे रीफ्यूअलिंग प्रक्रियेदरम्यान कोणत्याही संपर्कास प्रतिबंध करेल. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात, भारतभरात 3 हजार इंडियन ऑइल आऊटलेट्स व्यापल्या जातील.
नवीन सेवा सुरू करताना इंडियनऑयलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य म्हणाले, “इंडियन ऑइल आयसीआयसीआय बँक फास्टॅग पेमेंट्सची सुरूवात डिजिटल इंडियाचीसाठी एक महत्त्वपूर्ण झेप आहे, कारण इंडियन ऑयल आणि आयसीआयसीआय बँक ग्राहकांना फ्यूलिंगचा एक वेगळा आणि उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी FASTag सह हात मिळवला आहे.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रथम ग्राहकांना पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या कर्मचार्यांना सांगावे लागेल की, FASTagद्वारे तुम्हाला पैसे द्यायचे आहे. यानंतर कर्मचारी आपल्या कारवर स्थापित FASTag स्कॅन करेल, त्यानंतर आपल्या फोनवर एक ओटीपी येईल. जेव्हा या ओटीपी पीओएस मशीनमध्ये प्रवेश केला जाईल. तेव्हा तुमचे व्यवहार पूर्ण होईल.
FASTag एक स्टिकर आहे, जे आपल्या वाहनाच्या समोरच्या स्क्रीनवर लावले जातात. जेव्हा आपण राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असताना कोणत्याही टोलमधून जाता, तेव्हा तेथे स्थापित स्कॅनर डिव्हाइस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञानाद्वारे वाहनवरील स्टीकर स्कॅन केले जाते. मग त्या टोलवर असलेले पैसे वजा केले जातात.