नवी दिल्ली : केंद्रीय वित्त मंत्री अरूण जेटलीने मंगळवारी पेटीएम पेमेंट्स बँकेचे औपचारिक उद्घाटन केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी कार्यकारी निदेशक पी विजय भास्कर, नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडियाचे सीईओ दिलीप आसबे, पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा आणि पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचे एमडी आणि सीईओ रेणु सत्ती  देखील उपस्थित होते. शर्मा यांनी सांगितले की, भारत वित्तीय क्रांतीच्या दरवाजात उभा आहे. यामध्ये लोकशाही आणि वित्तीय सेवांच्या उपलब्धतेमुळे देशात हजारो नोकऱ्यांची संधी निर्माण होणार आहे. त्यामध्ये पेटीएमचा वित्तीय सेवा देण्यात मोठा वाटा असणार आहे. 


पेटीएम पेमेंट्स बॅक ही ऑनलाइन ट्रान्झेशनवर शून्य दर आकारत असून अकाऊंटमध्ये शून्य बॅलेन्स ठेवणारी भारतातील सर्वात पहिली मोबाइल बँक असणार आहे. या बँकेला देशात वित्तीय समावेश मिळवून देण्यासाठी डिझाइन करण्यात आली. तसेच भारतीयांना अर्थव्यवस्थेच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी पेटीएम हे महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. कंपीनेने केवायसीमार्फत ५०० मिलियन  गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. तसेच ग्राहकांसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि पेमेंट्स बँक खाते खोलण्यासाठी हे केंद्र स्थापित केलं आङे. 


पेटीएम बँकेशी जोडलेल्या खास गोष्टी 


पेपरलेस अकाऊंट ओपनिंग 


पेटीएम पेमेंट बँक ही पहिली अशी बँक आहे जिथे अवघ्या काही मिनिटांत खात खोललं जाणार आहे. आणि या सर्व गोष्टी अगदी घरात बसून शक्य आहे. अॅपद्वारेच तुम्ही बँकेत खाते तयार करू शकता. आधार आणि इतर महत्वाची माहिती ऑनलाइन भरल्यानंतर तुम्ही सहज डिजिटल बँकेचा वापर करू शकता. 


झिरो बॅलेंस 


इतर बँकेत अकाऊंट ओपन करण्यासाठी आणि मेनटेन करण्यासाठी काही रक्कम भरणं आवश्यक असते. मात्र पेटीएम पेमेंट बँकेत शून्य रुपयात अकाऊंट ओपन होणार आणि अकाऊंटमध्ये रक्कम ठेवणे बंधनकारक नाही. 


फ्री ऑनलाईन ट्रांझेशन 


कोणत्याही बँकेत पेटीएमचा वापर केल्यास तुम्हाला एक रक्कम चार्ज म्हणून लावली जाते. मात्र पेटीएम पेमेंट्स बँकेत आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस किंवा यूपीआयमार्फत डिजिटल ट्रान्सेझन केले तर कोणताही चार्ज लागणार नाही. कोणत्याही ऑनलाईन ट्रान्झेशनवर चार्ज लावला जाणार नाही. 


RuPay डेबिट कार्ड 


पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सर्व खातेधारकांना RuPay डेबिट कार्ड दिलं जाईल. याचा वापर कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये तुम्ही करू शकता. या कार्डला एटीएममध्ये कॅश काठण्यासाठी वापरू शकता. 


Paytm चे ATM


देशात पेटीएम पेमेंट बँक सुरू झाल्यानंतर मार्च २०१८ पर्यंत १ लाख एटीएम सुरू करण्याची योजना आहे.