मुंबई : One97 कम्युनिकेशन कंपनीचा डिजिटल मोबाइल पेमेंट प्लॅटफॉर्म PayTm चा शेअर मार्केटमध्ये मोठी कामगिरी करणार असे मानले जात होते. गुरूवारी कंपनीच्या शेअरचा बाजारात सामावेश झाला. परंतू पहिल्याच दिवशी शेअरने गटांगळ्या खाल्ल्या. शेअरमध्ये मोठी घसरण होत गेली. यावेळी गुंतवणूकदारांना आर्थिक नुकसान झाले. पेटीएम शेअरची किंमत इश्यू किंमत 2150 रुपये इतकी होती. त्या तुलनेने बाजारात शेअरची किंमत 23% कमी झाली. (PayTm Stock Price)


मार्केट कॅप घसरली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज हा शेअर बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये (BSE)  1,955 रुपयांना तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये(NSE) 1,950 रुपयांवर लिस्ट झाला होता. लिस्टिंग झाल्यानंतरही शेअर्समध्ये घसरण सुरूच होती.


पेटीएमचा मार्केट कॅप 1.08 लाख कोटी रुपयांवर घसरला आहे. लिस्टिंगपूर्वी मार्केट कॅप अंदाजे 1.48 लाख कोटी रुपये होती.


पुढेही घसरण होत राहील


ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने आपल्या अहवालात दावा केला आहे की, पेटीएमच्या स्टॉकमध्ये आणखी घसरण होऊ शकते. स्टॉक सध्याच्या किंमतीपेक्षा 40% अधिक घसरू होऊ शकतो. सध्या या शेअरची किंमत 1560 रुपये आहे.


पण, येत्या काही दिवसांत शेअरची किंमत 1,200 रुपयांपर्यंत जाऊ शकते. कंपनीला नफा मिळवून देणं पेटीएमसमोर मोठं आव्हान असल्याचं मॅक्वेरी सांगतात. 


मुल्यांकन महाग


PayTm चा IPO हा 18,300 कोटी रुपयांचा देशातील सर्वात मोठा IPO आहे. पण, ब्रोकरेज फर्मचा म्हणणे आहे की पेटीएमचे मुल्यांकन खूप महाग आहे. रिझर्व्ह बँक लवकरच फिनटेक कंपन्यांसाठी बBuy Now, Pay Later वर नियमन आणू शकते.


ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की कंपनीने निधी उभारला आहे, पण व्यवसाय सध्या तोट्यात आहे. अशा स्थितीत Outlook मजबूत दिसत नाही.


शॉर्ट टर्म गुंतवणूकदार काय करतात?


Tradingo चे संस्थापक पार्थ न्याती म्हणतात की, जर तुम्ही शॉर्ट टर्म गुंतवणूकदार असाल आणि तुम्हाला पेटीएमचा शेअर मिळाला असेल तर तुम्ही कोणत्याही बाउन्सबॅकवर शेअर्स विकून बाहेर पडणे गरजेचे आहे. 


तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल, तर पेटीएम ऐवजी इतर पर्यायांवर लक्ष ठेवा, बाजारात अनेक कंपन्या चांगली कामगिरी करण्यास तयार आहेत.  न्याती म्हणतात की पेटीएमचं मुल्यांकन तुलनेने जास्त दिसत असल्याने.


ज्यामुळे शेअरमध्ये नजीकच्या काळात आणखी घसरण होऊ शकते.