मुंबई : डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा पुरवणाऱ्या पेटीएमने 21000 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्सची  (oxygen concentrators) ऑर्डर दिली आहे, जी मेच्या पहिल्या आठवड्यापासून देशात उपलब्ध होईल. Paytm कंपनीच्या प्रवक्त्याने बुधवारी ही माहिती दिली. कंपनीने लोकांकडून 5 कोटी रुपये जमा केले होते आणि तेवढीच रक्कम कंपनीने मिळवून या 10 कोटींच्या रकमेमधून ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्सची खरेदी केली जात आहे. हे ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स हवेतून ऑक्सिजन जमा करुन ज्या रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत आहे त्यांच्यासाठी कामी येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, पेटीएम फाउंडेशनने तातडीने दिलासा देण्यासाठी 21000 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स आयात करण्याची ऑर्डर दिली आहे. आमचे संस्थापक विजय शेखर शर्मा कोविड मदत उपायांना पुढे नेण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांसह एक समर्पित संघाचे नेतृत्व करीत आहेत.' ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स एक असे साधन आहे जे वातावरणाच्या हवेमधून ऑक्सिजन घेते. ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रूग्णांसाठी हे डिव्हाइस वापरले जाऊ शकते.



प्रवक्त्यांनी सांगितले की ही साधने तातडीने शासकीय रुग्णालये, कोविड केअर सुविधा, खाजगी रुग्णालये, नर्सिंग होम आणि निवासी कल्याणकारी संघटनांकडे पाठवले जातील. “ऑक्सिजन फॉर लाइफ मोहिमेचा एक भाग म्हणून, पेटीएम फाऊंडेशन वेबसाइटवर, खाजगी रुग्णालये, निवासी कल्याणकारी संघटना आणि स्वयंसेवी संस्था ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्सच्या खरेदीसाठी मार्गदर्शनाची विनंती करू शकतात,” असे प्रवक्त्याने सांगितले.


भारत सध्या कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसर्‍या लाटेचा सामना करीत आहे. देशातील बर्‍याच रुग्णालयांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजन आणि बेडचा तुटवडा झाल्याचे वृत्त आहे. भारतात दिवसभरात दररोज 3 लाखाहून अधिक रुग्णांची वाढ होत आहे. यामुळे देशातील कोरोना विषाणूची एकूण संख्या 1,79,97,267 वर पोहोचली आहे.