Pension Scheme: देशभरात लग्नाचे वातावरण आहे.अनेक तरूण-तरूणी लग्न बंधनात अडकतायत. या लग्नाच्या बेडीत अडकणाऱ्या नवविवाहितांसाठी (Married Couple) मोठी बातमी समोर आली आहे. तुम्ही जर या योजनेत पैसे गुंतवाल तर तुम्हाला निवृत्तीनंतर 18,500 रुपये पेन्शन (Pension Scheme) सुरू होईल. त्यामुळे जर तुम्ही इच्छूक असाल तर या योजनेत पैसै गुंतवा आणि भविष्य उज्वल करून घ्या.


योजना काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरातील विवाहित जोडप्यांचे जीवन सुधारण्यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY) चालवत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन 4 मे 2017 रोजी ही योजना सुरू करण्यात आला होती. ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. सरकारकडून एलआयसी (lic) ही योजना चालवत आहे. 


जोडप्यांना किती पेन्शन मिळते?


प्रधानमंत्री वय वंदना योजनेत (PMVVY) वार्षिक 7.4 टक्के व्याज मिळतो. आता 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक यामध्ये 15 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. पती-पत्नी दोघेही या योजनेत गुंतवणूक करू शकतात. जर दोघांनी वयाच्या 60 व्या वर्षी या योजनेत प्रत्येकी 15 लाख रुपये गुंतवले तर दोघांनाही 18,500 रुपये पेन्शन मिळेल. पती-पत्नीपैकी एकाने 15 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास त्यांना 9,250 रुपये मिळतील.


एका व्यक्तीस किती पेन्शन मिळते?


जर तुम्ही किमान 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,000 रुपयांची गुंतवणूक मिळेल. 15 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दरमहा 9,250 रुपये पेन्शन मिळेल. जर पती-पत्नीने गुंतवणूक केली तर त्यांना 30 लाख रुपये गुंतवावे लागतील आणि त्यानंतर तुम्हा दोघांना दरमहा 18,500 रुपये मिळतील.


दरम्यान ही योजना नवविवाहितांसाठी खुरच चांगली आहे. त्यामुळे तुम्ही जर इच्छुक असाल तर गुंतवणूक करा. तसेच PMVVY च्या वेबसाईटवर जाऊन यासंबंधित अधिक माहिती घ्या.