उन्हाळ्याचा आनंद लुटण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे पोहणे. मग तो तलाव असो, समुद्रकिनारा किंवा गोड्या पाण्याची नदी असो. पोहणे हा शरीरासाठी संपूर्ण व्यायाम आहे. तीव्र उष्णतेमध्ये आपले शरीर थंड ठेवण्यासाठी पोहणे हा देखील एक चांगला मार्ग आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र नदीत  किंवा तलावात पोहताना सावध असणं का गरजेचं आहे हे तुम्हाला या व्हिडीओवरून समजेल. व्हिडीओत काही परदेशी लोक नदीत पोहण्याचा आनंद लुटत होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अगदी स्वच्छ आणि निळ्या रंगाची नदी दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Wildistic (@wildistic)


अचानक एक मोठा साप पाण्यात शिरला आणि एका मुलाच्या मागे पोहू लागला. जेव्हा साप मुलाचा पाठलाग करतो तेव्हा तो मुलगा पटकन पाण्यातून बाहेर पडतो. यानंतर, तो खिशातून मोबाईल कॅमेरा काढतो आणि नंतर व्हिडिओ शूट करू लागतो. साप त्याचा पाठलाग करणे थांबवत नाही आणि त्या मुलाच्या मागे लागतो.


मुलगा न घाबरता त्याची चप्पल उचलतो आणि तिथे असलेल्या दगडावर उभा राहतो. हा मुलगा हातात मोबाईल घेऊन व्हिडिओ बनवणं सोडत नाही. काही सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


वाइल्डिस्टिक नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला.