मुंबई : आज मध्यरात्रीपासून देशभरात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू केला जाणार आहे. या जीएसटीने काही वस्तू, सेवा स्वस्त होणार आहेत तर काही महागणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र ज्या जीएसटीचा इतका गाजावाजा केला जातोय ते जीएसटी म्हणजे नेमके काय, त्याचा फुलफॉर्म काय हेच देशातील अनेकांना माहीत नाहीये. झी न्यूजच्या प्रतिनिधींनी लोकांकडून जीएसटी म्हणजे नेमके काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 


यावेळी लोकांनी दिलेली उत्तर खरंच आश्चर्यचकित करणारी होती. अनेकांनी तर जीएसटी म्हणजे ग्लोबल सर्व्हिस टॅक्स, जनरल सर्व्हिस टॅक्स, गर्व्हनमेंट सर्व्हिस टॅक्स असे सांगितले. केवळ अशिक्षितच नव्हे तर अनेक सुशिक्षित तरुण-तरुणींना जीएसटीचा अर्थ माहीत नव्हता. अनेकांनी तर या विषयावरच बोलणे टाळले.