मुंबई : पेप्सी कंपनीने सोशल साइट्सवर फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम यांच्याविरुद्ध नागरी दावा दाखल केला आहे. या कंपन्यांकडून २.१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. पेप्सी कंपनीचे स्नॅक 'कुरकुरे'मध्ये प्लास्टिक असल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का, किंवा तसं काही कानावर आले आहे का? जर असं काही ऐकण्यात आले किंवा वाचले असेल तर ते सोडून द्या. याबाबत तुम्ही फेसबुक किंवा ट्विटर वर अशा गोष्टी लिहू नका अथवा पोस्ट करु नका. पेप्सी कंपनीने याबाबत कडक पाऊल उचलले आहे. अशा पोस्ट करणाऱ्यांवर कायदेशीर नोटीस पाठविण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इकॉनॉमिक टाइम्स'च्या मते, भारतातील शेकडो सोशल मीडिया वापरकर्त्यांना दिल्ली उच्च न्यायालयामध्ये कायदेशीर कारवाई करण्यासाठी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. खरं तर, पेप्सी कंपनीने फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल साइट्सवर खटला दाखल केला आहे. पेप्सीको इंडियाने सोशल मीडिया कंपन्यांकडून २.१ कोटी रुपये नुकसान भरपाई मागितली आहे. कंपनी म्हणते की या संकेतस्थळांनी अपमानकारक आणि दिशाभूल करणारी माहिती पसरविण्याचे काम केले आहे. त्यामुळे आमच्या ब्रॅन्डला फटका बसलाय. 


खोटे दावे


उच्च न्यायालयाच्या नोटीशीनंतर फेसबुक आणि ट्विटरने अशा पोस्ट केल्या सदस्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. याबाबत युजर्सना संदेश पाठविलाय. तुमची माहिती दिल्ली उच्च न्यायालयाला पाठविण्यात आलेली आहे. पेप्सी कंपनी म्हणणे आहे की, सोशल मीडियामध्ये पोस्ट आणि व्हिडीओद्वारे खोटी आणि चुकीची माहिती परसविण्यात येत आहे. कुरकुरे यामध्ये प्लास्टिक आहे. ते लोकांसाठी आणि आरोग्यासाठी हानीकारक असतात. दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी १४ नोव्हेंबरला होणार आहे.


कारवाई केली


YouTube, स्पष्ट केले आहे की, आम्हाला मिळालेली माहिती आम्ही काढून टाकली आहे. दरम्यान, फेसबूक आणि ट्विटरने अशी माहिती काढली की नाही, याची माहिती मिळू शकलेली नाही. तर पेप्सिको कंपनीने पोस्ट आणि युआरएलसह माहिती न्यायालयात सादर केली आहे. फेसबुकच्या ३४१२ लिंक आणि २०,२४४ पोस्ट तसेच ट्टिटरच्या ५६२ लिकं, यू-ट्यूबच्या २४२ लिंक आणि इंस्टाग्रामच्या ६ लिंकचा यात समावेश आहे.