लखनऊ : उत्‍तर प्रदेशतील सहारनपूरमध्ये जातीय संघर्षानंतर राजकारण होऊ लागलं आहे. सहारनपूर हिंसेनंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. यातच काँग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी २७ मेला सहारनपूर जाणार असं त्यांनी सांगितलं होतं. पण यूपीचे एडीजी आदित्‍य मिश्रा यांनी राहुल गांधींना सहारनपूरला दौऱ्याची परवानगी नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


बहुजन समाज पक्षाच्या अध्‍यक्षा मायावती या सहारनपूर येथे गेल्या होत्या. त्यानंतर तेथे हिंसा भडकली होती. अनेक पक्षाचे राजकीय नेते येथे ठाण मांडून आहेत. विरोधक यावरुन राजकारण करत आहेत. सध्या सहारनपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहेच. पण अजून परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलीस आणि सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.