LIC चा जबरदस्त प्लॅन! थेट 40 व्या वर्षापासून घ्या 50 हजारापर्यंतच्या पेंशनचा फायदा; जाणून घ्या
LIC Saral Pension Yojana : एलआयसीच्या या योजनेत पैसे गुंतवणूक करून पेंशन मिळवण्यासाठी 60 व्या वर्षापर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. आता तुम्हाला 40 व्या वर्षीच पेशन मिळू शकते.
मुंबई : LIC Saral Pension Yojana जेव्हा पेंशनचा विचार आपल्या मनात येतो. त्यावेळी आपण नेहमीच 60 व्या वर्षानंतरचे नियोजन करीत असतो. परंतु आता एलआयसीने नियमांमध्ये बदल केला आहे. आता तुम्हाला 60 वर्षांपर्यंत पेंशनसाठी थांबवण्याची गरज नाही. LIC ने नवीन प्लॅन जारी केला आहे. या प्लॅननुसार एकाच वेळी निश्चित रक्कम जमा करून तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षी पेंशन मिळायला सुरू होईल. जाणून घेऊ या सविस्तर...
Saral Pension Yojana काय आहे?
एलआयसी पेंशन योजना (Saral Pension)योजना हा एक सिंगल प्रीमियम पेंशन प्लॅन आहे. ज्यामध्ये पॉलिसी घेताना एकदाच प्रीमियम देणे गरजेचे असते. त्यानंतर पूर्ण आयुष्यभर तुम्हाला पेंशन मिळत राहते. जर पॉलिसीहोल्डरची डेथ झाली तर नॉमिनीला सिंगल प्रीमियमची पूर्ण रक्कम परत केली जाते. सरळ पेंशन योजना एक इमिडिएट एन्यूटी प्लॅन आहे. म्हणजेच पॉलिसी घेतल्यानंतर लगेचच तुम्हाला पेंशन सुरू होईल.
दोन प्रकारे घेऊ शकता ही पॉलिसी
Single Life : यामध्ये पॉलिसी एका व्यक्तीच्या नावावर असते. जोपर्यंत पेंशन होल्डर जिवंत आहे. तोपर्यंत त्याला पेंशन मिळत राहिल. त्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीला बेस प्रीमियमची रक्कम परत दिली जाईल
Joint Life : यामध्ये दोन्ही लाइफटाइम कवरेज असते. जोपर्यंत प्रायमरी पेंशन होल्डर जिवंत असतील तोपर्यंत त्यांना पेंशन मिळत राहिल. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नीला पेंशन मिळेल. पत्नीच्याही मृत्यूनंतर बेस प्रीमियम नॉमिनीला सोपवण्यात येईल.
सरल पेंशन योजना कोण घेऊ शकतं?
या योजनेचा लाभ घेण्याची किमान वयोमर्यादा 40 वर्षे इतकी आहे. तर कमाल वयोमर्यादा 80 वर्षे इतकी आहे. ही एक आयुष्यभर मिळणारी पेंशन पॉलिसी आहे. सरल पेंशन पॉलिसी सूरू होण्याच्या तारखेपासून 6 महिन्यानंतर कधीही सरेंडर करता येते.
जर तुम्ही 40 वर्षाचे असाल तसेच तुम्ही 10 लाख रुपयांचे सिंगल प्रीमियम जमा केले असेल तर वर्षाला 50 हजार 250 रुपये मिळू शकतात.