मुंबई : कच्च्या तेलाचा प्रमुख उत्पादक असलेल्या अबु धाबीमध्ये प्रस्तावित बैठकीआधी शुक्रवारी कच्चे तेल 70 डॉलर प्रति बॅरल पेक्षा कमी आलंय. हा स्तर 2018 नंतर पहिल्यांदाच 70 च्या खाली आलायं. लंडनमध्ये सकाळच्या व्यवहारात ब्रेंट क्रूड (उत्तरी सागर) जानेवारी डिलीव्हरी 96 सेंट पडून 69.69 डॉलर प्रति बॅरलवर आलीयं. अमेरिकेत तेल भंडार वाढल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत ही घसरण पाहायला मिळतेयं. या आठवड्यात ओपेक आणि गैर ओपेक प्रमुख कच्चे तेल उत्पाद देशांच्या किंमतीत झालेली घसरण पाहता संभाव्य दर कपातीबाबत अबु धाबीमध्ये बैठक होणार आहे.


ऑक्टोबरनंतर 20 टक्के घसरण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्री बाजारात कच्चे तेल 3 ऑक्टोबर 2018 ला ब्रेंट क्रूड 86.74 डॉलर प्रति बॅरल होतं.


ज्यामध्ये 9 नोव्हेंबर 2018 ला घसरण होऊन 69.70 डॉलर प्रति बॅरल झालं.


WTI क्रूड देखील 20 टक्क्यांनी कमी होऊन 65.60 डॉलर प्रति बॅरल झालंय.


आंतरराष्ट्रीय बाजारातील पंधरवड्यात सुरू असलेल्या किंमतीवरून सरकारी तेल कंपन्या पेट्रोल डीझेलच्या दरातील चढउताराचा हिशोब ठरवतात.


या हिशोबानुसार तर भारतात पुढच्या पंधरवड्यात पेट्रोल डीझेलच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.


21 दिवसांपासून घसरण 


गेल्या 21 दिवसांपासून पेट्रोल डीझेलच्या किंमतीत घसरण पाहायला मिळतेयं.


मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 76.22 रुपये प्रति लीटर आहे.


केंद्र सरकारने किंमती केल्यानंतर शुक्रवारी सलग 21 व्या दिवशी पेट्रोल डीझेलच्या किंमतीत कपात झाल्याचे पाहायला मिळतंय.