पेट्रोल डिझेलच्या किंमतीत घट सुरूच, पाहा आजचे दर
सकाळी 6 वाजल्यानंतर प्रत्येक पेट्रोल पंपवर नवे दर डिस्प्ले केले जात आहेत.
मुंबई : पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस घट होताना पाहायला मिळतेय. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 79.12 रुपये प्रति लीटर असून डिझेल 71.71 रुपये प्रति लीटर किंमतीत मिळतंय. सर्व तेल कंपन्यांचे पेट्रोल पंपावरी दर समान आहेत. सकाळी 6 वाजल्यानंतर प्रत्येक पेट्रोल पंपवर नवे दर डिस्प्ले केले जात आहेत. 16 जून पासून पेट्रोल आणि डिझेलच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे बदलत आहेत.
रुपया मजबूत
खूप मोठ्या काळाच्या घसरणीनंतर आता रुपयांत मजबूतीचा ट्रेंड सुरू झालायं.
हे वर्ष संपेपर्यंत भारतीय रुपया आणखी मजबूत झालेला दिसेल. '2018 पर्यंत रुपयावर दबाव वाढला होता पण डिसेंबर पर्यंत भारतीय करंसी दोन ते तीन टक्क्यांनी मजबूस होऊ शकते', असं स्टैंडर्ड चार्टर्डमध्ये साउथ एशियाचे फॉरन एक्सचेंज, रेट्स आणि क्रेडिट हेड गोपीकृष्णन एमएस सांगतात.
ग्राहकांना दिलासा
17 ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती होण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर पेट्रोल 6.45 रुपये आणि डिझेल 4.42 रुपये प्रति लीटर स्वस्त झालं.
गुरुवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिेझेलचे दर 71.27 रुपये प्रति लीटर झालं.
सरकारी कंपन्यांनी क्रूडच्या नरमीचा संपूर्ण फायदा थेट ग्राहकांना दिला तर किंमती आणखी कमी होऊ शकतात.
आज मुंबईत पेट्रोल 81.50 रुपयांनी तर डिझेल 74.34 रुपयांनी मिळतंय.