पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, पहा आजचे दर
गेले सहा दिवस दरात होतोय बदल
मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत एक दिवस स्थिरता आल्यानंतर गुरूवारी सकाळी घसरण पाहायला मिळाली. या अगोदर सतत सहा दिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल पाहायला मिळाले. गेल्या महिन्यात दरांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली.
सप्टेंबर महिन्यात रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली होती. पण ऑक्टोबर महिन्याच्या अगदी सुरूवातीपासूनच दरात घसरण पाहायला मिळाली. 3 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर पर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाली. आता 10 ऑक्टोबर रोजी देखील दरात घसरण पाहायला मिळाली. गुरूवारी सकाळी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 5 पैसे आणि डिझेलच्या दरात 6 पैशांनी कपात झाली आहे.
दिल्लीत गुरूवारी सकाळी पेट्रोल 73.54 रुपये लीटर आहे तर डिझेल 66.75 रुपये प्रती लीटर आहे. मुंबई आणि चेन्नईत पेट्रोलच्या दरात क्रमशः 76.18 रुपये, 29.15 रुपये आणि 76.39 रुपये असा स्तर पहायला मिळाला. डिझेलच्या दरात 60.11 रुपये, 69.97 रुपये आणि 70.52 रुपये इतका आहे.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार क्रूडच्या दरात आणखी घसरण पाहायला मिळू शकेल. तेल कंपनी सौदी अरामकोवर ड्रोन हल्ला झाल्याच्या २५ दिवसानंतर सलग दुसऱ्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती घटल्या आहेत.सौदी अरामकोवर हल्ल्यानंतर पेट्रोलच्या किंमतीत ३ रुपयांनी वाढ आली होती. तर डिझेल देखील दीड रुपयांनी वाढले होते. आता क्रूड ऑईलच्या किंमती स्थिर राहतील असे तज्ञांचे मत आहे. आज सकाळी ब्रेंट क्रूड 58.15 डॉलर प्रति बॅरल आणि डब्ल्यूटीआय क्रूड 52.43 डॉलर प्रति बॅरल किंमतीपर्यंत पोहोचले.