दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा एका वाढ झाली आहे. नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काही दिलासा मिळताना दिसत नाहीये. तेल कंपन्यांनी 5 दिवसांत 4 वेळा किंमतींमध्ये वाढ केली आहे. आजंही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये 80 पैशांची वाढ झाली आहे. नवीन किंमती आज सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शुक्रवारी दिल्लीत पेट्रोल 97.81 रुपये प्रतिलिटर मिळत होतं. तर आता यामध्ये 80 पैशांची वाढ झाली आहे. याची किंमत 98.61 रुपये प्रति लिटरवर पोहोचलीये. तर डिझेलची किंमत 89.07 रुपये होती. आता शनिवारपासून भाव वाढले असून 89.87 रुपये प्रति लिटर मिळणार आहे.


5 दिवसांत महागलं पेट्रोल


कंपन्यांकडून तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाचं बजेट बिघडलंय. गेल्या 5 दिवसात तेलाच्या किमती 4 वेळा वाढल्या आहेत. म्हणजेच पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेल 3.20 रुपयांनी महागलं आहे.


देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. या दोन्हींच्या किमती पुन्हा एकदा प्रतिलिटर 80 पैशांनी वाढवण्यात आल्या आहेत. तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.