पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
इंडियन ऑइलच्या मते सोमवारी सकाळी आंध्रप्रदेश आणि तेलंगाना राज्याची राजधानी हैदराबादमध्ये डिझेलची किंमत 67.08 रुपये प्रति लीटर आहे. हैदराबाद व्यतिरिक्त केरळच्या त्रिवेंद्रममध्येही डिझेलची किंमत 67.05 रुपये प्रति लीटर नोंदवली गेली आहे. छत्तीसगडमधील दरवाढ 66.71 रुपये, राजस्थानच्या जयपूरमध्ये 66.16 रुपये, गुजरातच्या गांधीनगरमध्ये 66.36 रुपये आणि उडिसाच्या भुवनेश्वरमध्ये 66.22 रुपये प्रति लीटर पेट्रोलचा दर आहे.
पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 79.06 रुपये प्रति लीटर नोंदवली गेली आहे. मुंबईमध्ये 3 महिन्यांमधला हा सर्वात मोठा दर आहे. राजधानी दिल्लीमध्ये 71.18 दर आहे. ऑगस्ट 2014 नंतर हा सर्वात जास्त दर आहे. सोमवारी कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 73.91 रुपये आणि चेन्नईमध्ये 73.80 रुपये प्रति लीटर आहे.
पेट्रोल आणि डिझेलवर तुम्ही 0.75 टक्के सवलत मिळवू शकता जर तुम्ही पेट्रोल भरल्यानंतर डिजिटल पेमेंट करता तर. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ट, भीम अॅप, पेटीएम किंवा इतर दुसऱ्या डिजिटल माध्यमातून तुम्ही पेमेंट करु शकता.