पेट्रोल - डिझेलच्या दरात कपात, आताचा दर
काय आहे दर
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे पुन्हा एकदा ग्राहकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मंगळवारी दिल्लीत पेट्रोलमध्ये 13 पैशांनी कपात झाली असून आता दर 77.43 रुपये प्रती लीटर आहे. पेट्रोलसोबतच डिझेलच्या दरात देखील कपात झाली आहे. 12 पैशांनी हे दर कमी झाले असून आताचा डिझेलचा दर 72.19 रुपये प्रती लीटर आहे.
मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी झाले आहेत. मंगळवारी मुंबईत पेट्रोलचा दर 13 पैशांनी कमी होऊन तो 82.94 रुपयांवर पोहोचला आहे तर डिझेलची किंमत 12 पैशांनी कमी होऊन 75.64 रुपयांवर पोहोचला आहे.
सोमवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत 17 पैशांनी प्रती लीटर कमी झालं आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 77.56 रुपये प्रती लीटर कमी केलं आहे. तर डिझेलची किंमत 15 पैशांनी प्रती लीटर कमी झालं असून 72.31 रुपये प्रती लीटर झाली आहे. तर मुंबईत 17 पैशांनी पेट्रोलचा दर कमी झाला आहे. तेव्हा पेट्रोलची किंमत 83.07 रुपये प्रती लीटर आहे तर डीझेल 16 पैशांनी कमी झालं असून 75.76 रुपये प्रती लीटर आहे.