Petrol-Diesel Price on 14 May 2023 : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. WTI क्रूड 1.17 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल $70.04 वर व्यवहार करत आहे. तर ब्रेंट क्रूड 1.08 टक्क्यांच्या घसरणीसह $ 74.17 वर विकले जात आहे. दरम्यान, आज सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी (IOCL) जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price ) किरकोळ किमतींमध्ये बदल दिसून आला आहे. आज देशात अनेक ठिकाणी इंधनाच्या दरात वाढ झाली होती, तर अनेक काही ठिकाणी नरमाई दिसून आली आहे. तुम्ही जर आज गाडीने घराच्या बाहेर पडणार असाल तर आधी पेट्रोलचे दर तपासून घ्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारापेठेत खनिज तेलाच्या किंमतीत तेजी आहेत. पण देशांतर्गत बाजारपेठेतही गेल्या 282 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price ) किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. आज जाहीर झालेल्या पेट्रोल डिझेलच्या दरात महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल 20 आणि 21 पैशांनी महागले आहे.  तर बिहारमध्ये पेट्रोल 43 पैशांनी तर डिझेल 42 पैशांनी महागलं आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये पेट्रोलच्या दरात 46 पैशांनी तर डिझेलच्या दरात 43 पैशांनी वाढ झाली आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि पंजाबमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.  


इथे सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) iocl.com च्या अधिकृत वेबसाइटनुसार पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price ) विकले जात आहे. जिथे पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे. त्याचबरोबर  दुसरीकडे हिमाचल प्रदेशात पेट्रोल 88 पैशांनी तर डिझेल 78 पैशांनी स्वस्त झाले आहे. मध्य प्रदेशातही पेट्रोलच्या दरात 38 पैशांनी तर डिझेलच्या दरात 36 पैशांनी घट झाली आहे. चेन्नईमध्येही पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 10 आणि 9 पैशांनी स्वस्त झाले आहे.


इथे सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल


राजस्थानातील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल (पेट्रोल डिझेल किंमत) विकले जात आहे. गंगानगरमध्ये पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर आहे. तर हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.


SMS द्वारे नवीनतम दर तपासा 


जर तुम्हाला घरी बसून पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला iocl ची वेबसाइट आणि मोबाईल नंबरवर एक एसएमएस करावा लागेल. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या शहराचे दर समजतील. इंडियन ऑइल (IOCL) च्या ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर संदेश पाठवावा लागेल.