नवी दिल्ली : तामिळनाडूच्या कोइम्बतूरमध्ये भाजप नेत्याच्या गाडीवर पेट्रोल बॉम्ब फेकून हल्ला करण्यात आला... आणि ही घटना सीसीटीव्हीतही कैद झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं म्हणजे, या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. न्यूज एजन्सी एएनआयनं जाहीर केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती भाजप जिल्हासचिवच्या गाडीवर पेट्रोल बॉम्ब फेकताना दिसत आहे. परंतु, या फुटेजमध्ये या व्यक्तीचा चेहरा मात्र स्पष्ट दिसत नाहीय.



या घटनेची सूचना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाली... पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.



उल्लेखनीय म्हणजे, तामिळनाडूच्या वेल्लोरमध्ये समाज सुधारक तसंच द्रविड आंदोलनाचे संस्थापक ई वी रामासामी पेरियार यांच्या प्रतिमा ध्वस्त झाल्यानंतर पेट्रोल बॉम्ब फेकण्याचं हे दुसरं प्रकरण आहे. यापूर्वीही कोइम्बतूरमध्ये भाजप ऑफिसवर पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर थानथई पेरयार द्रविड कजगम (टीडीपीके) कार्यकर्ता असलेला बालूनं स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं.