मुंबई :पेट्रोलच्या किंमतीत गेल्या १६ दिवसांत वाढ झाल्यानंतर एका पैशाची कपात केल्याने सोशल मीडियावर याची चांगलीच खिल्ली उडवली जातेय. बुधवारी सकाळी पेट्रोलच्या किंमतीत ६० पैसे आणि डिझेलच्या दरात ५६ पैशांची कपात करण्यात आली. मात्र दुपारी इंडियन ऑईल कॉरपोरेशनकडून स्पष्ट करण्यात आले की पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर केवळ १ पैशांची कपात करण्यात आलीये. पेट्रोल आणि डिझेलचे दर १ पैशांनी कमी केल्यानंतर सोशल मीडियावर याची चांगलीच खिल्ली उडवली जातेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
एका युझरने ट्विटरवर म्हटलेय की,  अरे सरकारने पेट्रोलच्या दरात एका पैशाने कपात केलीये. आपल्याला पेट्रोल भरणे गरजेचे आहे.