Petrol Diesel Price: 7 वर्षात कच्चा तेलात विक्रमी वाढ ! पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, जाणून घ्या नवीन दर
Petrol Diesel Price: वाढत्या महागाईत तेलाचा भडका अधिक उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : Petrol Diesel Price: वाढत्या महागाईत तेलाचा भडका अधिक उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 7 वर्षांच्या विक्रमी पातळीवर आहे. अशा स्थितीत देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांच्या चिंता वाढवत आहेत. देशाची राजधानी दिल्लीत मंगळवारी 1 लीटर पेट्रोलची किंमत 102.39 रुपयांवरून 102.64 रुपये झाली आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमत 91.08 रुपयांवर गेली आहे. तर मुंबईत 108.64 पेट्रोल झाले असून डिझेल 98.76 रुपयांपर्यत पोहोचले आहे. आता देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊया.
पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाणून घ्या (Petrol Diesel Rate Today)
शहर पेट्रोल(प्रति लीटर) डीजल (प्रति लीटर)
दिल्ली 102.64 रुपये 91.08 रुपये
मुंबई 108.64 रुपये 98.76 रुपये
कोलकाता 103.33 रुपये 94.14 रुपये
चेन्नई 100.02 रुपये 95.56 रुपये
प्रमुख शहरातील पेट्रोल (रुपये/लिटर) डिझेल (रुपये/लिटर)
शहर पेट्रोल (रुपये/लीटर) डीजल (रुपये/लीटर)
हैदराबाद 106.73 99.33
बेंगळुरु 106.17 96.62
पाटणा 105.51 97.42
रांची 97.30 96.11
लखनऊ 99.68 91.46
भोपाळ 111.10 100.10
चंडीगड 98.77 90.87
कच्च्या तेलामुळे महागाईचा विक्रम
कच्च्या तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांची संघटना ओपेकची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत नोव्हेंबरमध्ये प्रतिदिन 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्यावर चर्चा झाली. पण, उत्पादन वाढूनही किमती वाढत आहेत. हळूहळू उत्पादन वाढल्याने किंमती कमी होणार नाहीत.
पेट्रोलचे दर आठवड्यात 6 वेळा वाढले
काही काळ थांबल्यानंतर, एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत पेट्रोलच्या किंमतीत 6 वेळा वाढ करण्यात आली आहे. एवढेच नाही तर डिझेलच्या किमतीत 10 दिवसात 9 वेळा वाढ करण्यात आली आहे. डिझेल एका आठवड्यात 2.15 रुपयांनी महाग झाले आहे. त्याचबरोबर एका आठवड्यात पेट्रोलच्या किंमतीत 1.25 रुपयांनी वाढ झाली आहे.