नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कपात पाहायला मिळाली. मुंबई, दिल्लीत शुक्रवारी पेट्रोलच्या दरात १२ पैशांची कपात झाली आहे. कोलकातामध्ये ११ पैसे तर चेन्नईमध्ये पेट्रोल १३ पैसे लीटर स्वस्त झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई, चेन्नईत डिझेलचा दर १६ पैसे प्रति लीटरने कमी झाला. तर दिल्ली, कोलकातामध्ये डिझेलच्या दरात १५ पैशांची कपात झाली आहे.


इंडियन ऑइलच्या वेबसाटनुसार, पेट्रोलच्या दरात कपात होऊन मुंबईत पेट्रोल ७९.३ रुपये, दिल्ली ७३.४२ रुपये, कोलकाता ७६.०७, चेन्नई ७६.२५ रुपये प्रति लीटर इतका आहे. 


तर डिझेलचा दर मुंबई ६९.८१ रुपये, दिल्ली ६६.६० रुपये, कोलकाता ६८.९६ रुपये, चेन्नई ७०.३५ रुपये प्रति लीटर आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारात, कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होत आहे. 


तज्ञांच्या म्हणण्यानुसार, क्रूडच्या दरात आणखी घसरण पाहायला मिळू शकेल. तेल कंपनी सौदी अरामकोवर ड्रोन हल्ला झाल्याच्या २५ दिवसानंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती घटल्या आहेत.