पेट्रोल-डिझेलच्या दरात लागोपाठ आठव्या दिवशी ही वाढ
पेट्रोल-़डिझेल पुन्हा महागलं
नवी दिल्ली : कोरोना संकटात आधीच आर्थिक संकटात सापलेल्या लोकांना आता पेट्रोल-डिझेल वाढीचा ही सामना करावा लागतो आहे. देशातील सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी रविवारी लागोपाठ आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली आहे. पेट्रोलचे दर ६२ पैशांनी तर डिझेलचे दर ६४ पैशांनी वाढले आहेत. आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होत असताना देखील ही वाढ झाली आहे.
दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर आता ७५.७८ रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेल ७४.०३ रुपये प्रति लीटर झाले आहे. मुंबईत पेट्रोलचे दर ८२.७९ रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेल ७२.६४ रुपये प्रति लीटर झाले आहे. याआधी शनिवारी देखील पेट्रोल ५९ पैशांनी तर डिझेल ५८ पैशांनी महागलं होतं.
कोलकातामध्ये एक लीटर पेट्रोलसाठी ७७.६४ रुपये तर डिझेलसाठी ६९.८० रुपये मोजावे लागणार आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल ७९.५३ तर डिझेल ७२.१० रुपये प्रति लीटर झालं आहे.