मुंबई : पेट्रोल-डिझेलची संभाव्य भाववाढ टळण्याची शक्यता निर्माण झालीये. कारण गेल्या आठवड्यात गगनाला भिडलेले कच्च्या तेलाचा दर प्रतिबॅरल 30 डॉलरने कमी झालाय. मागील आठवड्यात क्रुड ऑईलचा दर 130 ते 135 डॉलर इतका होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव 103 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आलाय. 3 मार्चनंतर हा दर पहिल्यांदा एवढा कमी झालाय. रशिया-युक्रेन युद्ध अन्य देशांत पसरण्याची शक्यता मावळत चालल्यामुळे तसंच जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसण्याच्या भीतीमुळे कच्च्या तेलाचे दर घसरल्याचं मानलं जातंय. 


भारतात पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.. कमी दरात इंधन विक्रीची ऑफर रशियानं भारत सरकारपुढे ठेवलीये..रशियाची ही ऑफर भारताच्या विचाराधीन असल्याचं समजतंय. तर रुपया आणि रशियाचं चलन रुबल सेटलमेंट यंत्रणेवरही काम सुरू असल्याचं कळतंय 


रशिया - युक्रेन युद्धाचा परिणाम भारतातही दिसू लागला आहे. सनफ्लॉवर ऑईलच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. सनफ्लॉवर आईलचा 15 लिटरचा डबा तब्बल चारशे रूपयांनी महागला आहे.