नवी दिल्ली : महागाईचा उच्चांक गाठल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किंमती सातत्याने कमी होत असल्याचे गेले महिनाभर आपण पाहतोय. पण हा आनंद फार काळ टीकणार नाही. सध्या सुरू असलेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर संध्याकाळी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीच्या दरवाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने सरकारतर्फे एक्साइज ड्यूटी वाढण्याची घोषणा बुधवार पर्यंत होऊ शकते. जर एक्साईज ड्यूटी वाढली तर तेलाच्या दरात 2 रुपये प्रति लीटरने वाढ होईल. गुरूवार पासून तेलाचे नवे दर लागू होण्याची शक्यता आहे. निवडणूकीचे निकाल आल्यानंतर तेलाच्या वाढत्या किंमतीवरील निर्णय घेण्यात येणार आहे.


तेल उत्पादक देश 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे 2019 ची लोकसभा निवडणूक भाजपाला कठीण जाण्याचे संकेत वर्तवले जात आहेत.


तेल निर्यात करणारे 14 मोठ्या देशांचे समूह आणि 10 इतर तेल उत्पादक देशांनी कच्च्या तेलाच्या कमी होणाऱ्या किंमती पाहता महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.


कच्चा तेलाचे कमी होणाऱ्या किंमती स्थिर राहण्यासाठी तेल उत्पादनात प्रतिदिन 1.2 मिलियन बॅरल इतकी कपात करण्याचा निर्णय घेतलाय.


दरवाढीची घोषणा  



थोड्या वेळात पाच राज्यातील मतदानाचे निकाल जाहीर होण्यास सुरूवात होईल. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती घसरल्या नंतर केंद्र सरकारने पाचही राज्यांना निवडणुकीआधी दिलासा दिला होता.


केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 2.5 रुपयांची कपात केली होती.


राज्य सरकारनेही पेट्रोल डिझेलच्या किंमतीत 2.5 रुपयांनी कपात झाल्याची घोषणा केली होती.



त्यानंतर काही राज्य वगळता इतर सर्व राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतीत साधारण 5 रुपयांची कपात पाहायला मिळाली.


पण आता कच्चा तेलाच्या किंमती वाढल्याने सरकार पुन्हा दरवाढीची घोषणा करु शकते.