सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर
जाणून घ्या आजचे दर
नवी दिल्ली : पेट्रोल डीझेलच्या किंमती कमी होत नाही आहेत. सौदी अमेरिकेत दोन प्लांटवर ड्रोन हल्ला झाल्यानंतर आशियाई बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढलेल्या दिसत आहेत. देशा अंतर्गत बाजारातही याचा परिणाम पाहायला मिळत आहे. गुरुवारी सकाळी चार महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर सगल दुसऱ्या दिवशी वाढलेले दिसले. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही पेट्रोल ८० रुपये प्रति लीटर स्तरावर पोहोचले.
दिल्लीत गुरुवारी सकाळी पेट्रोल १५ पैसे प्रति लीटर दराने वाढुन ७४.३४ रुपये प्रती लीटर झाले आहे. तसेच डिझेल १० पैशांनी वाढून ६७.२४ रुपये लीटर झाले आहे. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये ७७.०३ रुपये, ८० रुपये आणि ७७.२९ रुपये स्तरावर पोहोचले आहे. तर डिझेलच्या किंमतीही क्रमश: ६९.६६ रुपये, ७०.५५ रुपये आणि ७१.१० रुपये स्तरावर पोहोचले आहे.
गेल्या १० दिवसांपासून पेट्रोलच्या किंमतीत २ रुपये प्रति लीटरने वाढ झाली. डिझेल देखील दिड रुपयांनी वाढले. शुक्रवारी सकाळी ब्रेंट क्रूड ६१.२२ डॉलर प्रति बॅरल आणि डब्ल्यटीआय क्रूड ५६.१६ डॉलर प्रति बॅरल स्तरावर पोहोचले.