नवी दिल्ली : गेल्या १० दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरांत दिसून आलेल्या वाढीला आज-गुरुवारी खीळ बसलीय. दिल्लीत गुरुवारी पेट्रोलच्या दरांत ६ पैशांनी तर डिझेलच्या भावांत ६ पैशांनी घट झाली. यासोबतच दिल्लीत पेट्रोलचा आजचा दर ७१.८० रुपये प्रती लिटर आणि डिझेल ६६.६३ रुपये प्रती लिटर दरावर आहे. तर मुंबईतही ६ पैशांच्या घसरणीसोबत पेट्रोलचे दर ७७.३८ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ६९.७९ रुपये प्रती लिटरवर पोहचलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्लेखनीय म्हणजे, लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर लगेचच इंधनाच्या किंमतीत वाढ दिसून येत होती. २८ आणि २९ मे रोजी पेट्रोलचे दर स्थिर राहिल्यानंतर आज (३० मे) रोजी यामध्ये घसरण पाहायला मिळालीय. गेल्या १० दिवसांत पेट्रोलच्या दरांत जवळपास ८३ पैशांची वाढ झालीय. 


काय आहे तुमच्या शहरांतला दर


शहर पेट्रोल/लीटर डिझेल/लीटर
दिल्ली  ₹७१.८० ₹६६.६३
मुंबई  ₹७७.३८ ₹६९.७९ 
कोलकाता ₹७३.८४ ₹६८.३६
चेन्नई ₹७४.५० ₹७०.४१ 
नोएडा ₹७१.३७ ₹६५.६८ 
गुरुग्राम ₹७१.८९ ₹६५.७६
 

 


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत गुरुवारी वाढ झाली. गुरुवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड ०.२१ डॉलर प्रती बॅरल वाढीसोबतच ५९.०२ डॉलर प्रति बॅरलच्या स्तरावर दाखल झालं. तर ब्रेंट क्रूड ०.०७ डॉलर प्रती बॅरल वाढून ६७.९४ डॉलर प्रती बॅरलच्या स्तरावर गेलं.