Petrol Diesel Rate : महाराष्ट्रात कुठे स्वस्त तर कुठे महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Petrol Diesel Rate Today : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 75 डॉलरपर्यंत खाली आली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर...
Petrol Diesel Rate on 3 June 2023 : पेट्रोलियम कंपन्यांनी आज (3 जून 2023 ) सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Rate) जाहीर केले असून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात थोडीशी घसरण झाली. ओपेकने तेल उत्पादनात कपात केल्याची घोषणा केल्यानंतर सर्वच देश चिंतेत पडले होते. मात्र काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Rate) किंचित बदस नोंदवला गेला आहे. तसेच कच्चा तेलाच्या किमतीतही या आठवड्यात चढउतार दिसून येत आहे. दरम्यान आज राज्यातील शहरांमध्ये एक लिटर पेट्रोल आणि डिझेलसाठी तुमचा खिसा इतका खाली करावा लागणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कच्च्या तेलात पुन्हा एकदा चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत पुन्हा एकदा प्रति बॅरल 75 डॉलरच्या पुढे गेली आहे. क्रूड ऑइल बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $1.85 किंवा 2.49% ने वाढून $76.13 प्रति बॅरल, WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $1.64 किंवा 2.34% ने वाढून प्रति बॅरल $71.74 वर पोहोचली.
महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर
- मुंबईत पेट्रोल 106.40 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- अहमदनगर पेट्रोल 106.14 आणि डिझेल 92.92 रुपये प्रतिलिटर
- अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये तर डिझेल 92.69 रुपये प्रतिलिटर
- अमरावती पेट्रोल 107.44 तर डिझेल 93.94 रुपये प्रतिलिटर
- औरंगाबाद 107.02 पेट्रोल आणि डिझेल 93.50 रुपये प्रति लिटर
- जळगावात पेट्रोल 106.58 रुपये तर डिझेल 93.10 रुपये प्रतिलिटर
- कोल्हापुरात पेट्रोल 107.45 रुपये आणि डिझेल 93.94 रुपये प्रतिलिटर
- लातूरमध्ये पेट्रोल 107.25 रुपये आणि डिझेल 93.74 रुपये प्रतिलिटर
- नागपुरात पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रतिलिटर
- नांदेडमध्ये पेट्रोल 107.89 रुपये आणि डिझेल 94.38 रुपये प्रतिलिटर
- नाशिकमध्ये पेट्रोल 106.56 रुपये आणि डिझेल 93.06 रुपये प्रतिलिटर
- परभणी पेट्रोल 109.47 रुपये तर डिझेल 95.86 रुपये प्रतिलिटर
- पुण्यात पेट्रोल 106.61 आणि डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर
- रायगड पेट्रोल 107.11 आणि डिझेल 93.57 रुपये प्रति लिटर
- सोलापुरात पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेलचा दर 93.29 रुपये प्रतिलिटर
- ठाण्यात पेट्रोल 105.77 रुपये आणि डिझेल 92.27 रुपये प्रतिलिटर
जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
तुमच्या शहरातील इंधनाची किंमत तपासण्यासाठी तुम्ही SMS वर माहिती मिळू शकते. इंडियन ऑइलच्या इंधनाची किंमत जाणून घेण्यासाठी, RSP<डिलर कोड> टाइप करा आणि 9224992249 वर एसएमएस पाठवा आणि HPCL ग्राहकांनी HPPRICE <डिलर कोड> टाइप करून 9222201122 वर एसएमएस पाठवावा आणि BPCL ग्राहकांनी 9223112222 वर एसएमएस पाठवावा. इतर तेल कंपन्या तुमच्या शहरातील तुमच्या मोबाईल नंबरवर किंमत पाठवतील.