मुंबई : सौदी अरबमध्ये झालेल्या हल्यांनंतर जगभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे. भारतही या संकटापासून सुटलेला नाही. सोमवारी दिल्ली पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळाली. यामुळे नोकरवर्गात असंतोष पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोलच्या दरात वाढ झाली असून 29 पैशांनी हा दर वाढला आहे. त्यामुळे आता पेट्रोलचा दर 73.91 रुपये इतका झाला आहे. तर 18 पैशांनी डिझेलचे दर वाढल्यामुळे आता 66.74 रुपये इतका डिझेलचा दर झाला आहे. रविवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ पाहायला मिळाली. 



गेल्या सहा दिवसांत पेट्रोलच्या दरात 1.59 रुपये आणि डिझेलच्या दरात 1.31 रुपये प्रति लीटर वाढ झाली आहे. सौदी अरबीमध्ये झालेल्या तेल साठ्यावरील ड्रोन हल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात पाच टक्के तेल कपात कमी झालं आहे. तर किंमतीत होणारी सततची वाढ यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. 


सौदी अरामकोच्या दोन प्लांटवर ड्रोन हल्ला झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या उत्पादनात कमतरता आली आहे, त्यामुळे ही भाववाढ झाली आहे. ५ जुलै २०१९ नंतर पेट्रोल-डिझेलच्या भावातली ही मोठी भाववाढ आहे. बजेटमध्ये पेट्रोल डिझेलवरटी एक्साईज ड्यूटी आणि सेस लावल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती अडीच रुपयांनी वाढल्या होत्या.