नवी दिल्ली : गेली सहा दिवसांच्या पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत स्थिरता पाहायला मिळाली. गेल्या सहा दिवसांपासून दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमतीत प्रति लीटर 63 पैशांची तर डीझेलच्या किंमतीत 1.13 पैशांची स्थिरता पाहायला मिळाली. तेल विपणन कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतीत काही बदल केले नाहीत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार मुंबईत पेट्रोलच्या किंमती 76.91 रुपये प्रति लीटर तर डीझेलच्या किंमती 68.76 रुपये प्रति लीटर आहे. दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किंमती  71.23 रुपये, 73.47 रुपये आणि 74.01 रुपये प्रति लीटर आहेत. तर या शहरातील डिझेलच्या किंमती क्रमश :65.56 रुपये, 67.48 रुपये आणि 69.36 रुपये प्रति लीटर आहेत.