Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण; जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे नवे दर
Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत.
Petrol Diesel Price Today : आंतरराष्टीय बाजारात कच्च्या तेलाची (Crude Oil) किंमत पुन्हा एकदा 80 डॉलरच्या खाली आली आहे आणि बेंचमार्क ब्रेंट क्रूडची (Brent Crude Oil) किंमत प्रति बॅरल 79.87 डॉलर इतकी आहे. पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) रोज सकाळी सहा वाजता राष्ट्रीय तेल कंपन्या अपडेट करतात. आज म्हणजेच 15 जुलै रोजी भारतीय तेल कंपन्यांनी दरही जाहीर केले आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या म्हणण्यानुसार, आजही इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत. गेल्या वर्षभरापासून पेट्रोल डिझेलच्या किमतीत फारसा बदल झालेला आहे.
देशातील चार महानगरांपैकी चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होताना दिसत आहे. शनिवारी पेट्रोल 11 पैशांनी आणि डिझेल 9 पैशांनी स्वस्त होत असून ते 102.63 रुपये आणि 94.24 रुपये प्रति लीटरने उपलब्ध आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. याशिवाय, दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही आणि ते 96.72 रुपये आणि 89.62 रुपये प्रति लीटरमध्ये उपलब्ध आहे. कोलकात्यातही इंधनाचे दर स्थिर आहेत आणि 106.03 रुपये आणि 92.76 रुपये प्रति लिटर मिळत आहेत.
गुजरातमध्ये पेट्रोल 97.15 आणि डिझेल 92.92 आहे. हिमाचल प्रदेशात पेट्रोलचा दर 97.78 आणि डिझेल 89.71 आहे. भोपाळमध्ये पेट्रोल 108.65 आणि डिझेल 93.90 आहे. याशिवाय झारखंडमध्ये पेट्रोल 100.50 आणि डिझेल 95.31 आहे. तेलंगणात पेट्रोल 109.78 आणि डिझेल 97.92 आहे. उत्तर प्रदेशात पेट्रोल 96.87 आणि डिझेल 90.05 आहे. उत्तराखंडमध्ये पेट्रोल 96.20 आणि डिझेल 91.30 आहे.
या शहरांमध्येही नवीन दर
नोएडामध्ये पेट्रोल 96.79 रुपये आणि डिझेल 89.93 रुपये प्रति लिटर झाले आहे.
गाझियाबादमध्ये 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर.
लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर झाले आहे.
पाटणामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर झाले आहे.
पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर झाले आहे.
दरम्यान, कच्च्या तेलाची किंमत 80 डॉलरच्या जवळ पोहोचली आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत 1.83 टक्के किंवा 1.49 डॉलरने कमी होऊन प्रति बॅरल 79.87 डॉलरवर पोहोचली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलची किंमत 1.47 डॉलर किंवा 1.91 टक्क्यांनी घसरून 75.42 डॉलर प्रति बॅरल झाली.