Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीतीला अस्थिरता कायम आहे. पण देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) मात्र स्थिर आहेत. तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्यांमध्ये तेलाच्या दरात बदल झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र देशात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपये प्रति लिटरनं स्वस्त झालं आहे. आज सलग 94व्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.   


कच्च्या तेलाचे नवे दर


काल (23 ऑगस्ट) दिवसभरात 90 डॉलर प्रति बॅरलच्या खाली पोहोचलेल्या कच्च्या तेलानं (Crude Oil) पुन्हा एकदा वाढ नोंदवली आहे. बुधवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 93.52 डॉलरवर पोहोचली आहे. तसेच, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 100 डॉलर्सच्या वर गेल्याचं पाहायला मिळत आहे. 


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com नं जारी केलेल्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर असल्याचे दिसून आले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.


तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर  


- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- नोएडामध्ये पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल १०८.४८ रुपये आणि डिझेल ९३.७२ रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल ९६.२० रुपये आणि डिझेल ८४.२६ रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर


दर कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.