Petrol-Diesel Price Today 16th  September : गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. मात्र देशांतर्गत बाजारातील पेट्रोल-डिझेलच्या (petrol-diesel price ) दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. 22 मे रोजी केंद्र सरकारने (Central Govt) पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर बदल झाला. मात्र, त्यानंतर महाराष्ट्र आणि मेघालयमध्येही तेलाच्या दरात बदल झाला आहे. (Petrol-Diesel Price Today on 16th September)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेल कंपन्यांनी 1 सप्टेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर  (Gas cylinder rate) कमी केले होते. दरम्यान एका अहवालात असे समोर आले आहे की, क्रूडच्या (Crude oil) घसरणीमुळे तेल कंपन्या पेट्रोल आणि एलपीजीमधील (LPG) खर्चाची भरपाई करण्याच्या स्थितीत पोहोचल्या आहेत. 22 मे रोजी साडेतीन महिन्यांहून अधिक काळ उत्पादन शुल्कात कपात करून केंद्राकडून मोठा दिलासा मिळाला होता.


शुक्रवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $85.05 वर पोहोचली. त्याच वेळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 90.85 वर दिसले.
  
पाहा तुमच्या शहरातील Petrol - Diesel Price  


- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 96.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर


पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरून https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx (येथे क्लिक करा) पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती SMS द्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.