Petrol Diesel Price on 2nd April 2023 : भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Rate) दररोज सरकारी तेल कंपन्या जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे ही किंमत निश्चित केली जाते. दरम्यान WTI कच्च्या तेलाच्या किमतीत 1.75 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर ते प्रति बॅरल $ 75.67 वर आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड ऑइल 1.64 टक्क्यांनी वाढले आहे आणि प्रति बॅरल $ 79.89 वर व्यापार करत आहे. अशा परिस्थितीत भारतातील चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि 94.33 रुपये प्रति लीटरने विकले जात असून पेट्रोल 10 पैशांनी आणि डिझेल 9 पैशांनी महागले आहे. याशिवाय गुरुग्राम, नोएडा सारख्या अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल नोंदवण्यात आला आहे. 


'या' शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोएडामध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) वाढ नोंदवली जात असून पेट्रोल 5 पैशांनी आणि डिझेल 6 पैशांनी महागले आहे आणि ते 96.64 रुपये आणि 89.82 रुपये प्रति लिटरने उपलब्ध आहे. तर गुरुग्राममध्ये पेट्रोल 7 पैसे स्वस्त आणि डिझेल 7 पैसे प्रति लीटर 96.77 रुपये आणि 89.65 रुपये स्वस्त विकले जात आहे. आज जयपूरमध्ये पेट्रोल 72 पैसे आणि डिझेल 66 पैसे स्वस्त दराने 108.67 रुपये आणि 93.89 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 96.62 रुपये आणि 89.81 रुपये प्रति लीटर 29 पैशांनी आणि डिझेल 28 पैशांनी महागले आहे. बिहारची राजधानी पटनामध्ये आज पेट्रोल 33 पैसे आणि डिझेल 30 पैसे स्वस्त दराने 107.24 रुपये आणि 94.04 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. आज रायपूरमध्ये पेट्रोल 13 पैसे स्वस्त आणि डिझेल 13 पैसे स्वस्त दराने 102.53 रुपये आणि 95.51 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. 


वाचा : मुंबईत आज तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक...प्रवाशांचे हाल होणार... 


आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai Petrol Rate) पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.


शहर डिझेल (रु.) पेट्रोल (रु.)
दिल्ली 89.62 96.72
मुंबई 94.27 106.31
कोलकाता 92.76  106.03
चेन्नई 94.24 102.63 

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.


घरबसल्या चेक करा नवे  दर 


तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.