Petrol-Diesel Price: `या` शहरात पेट्रोल महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Today Petrol Diesel Rate : 2022 मधील मे महिन्यापासून भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र आजपण वाहनधारकांना दिलासा मिळाला की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर...
Petrol Diesel Price Today : सुट्टीच्या दिवशी अनेकजण कुटुंबासह बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असतात. जर तुम्हीपण घराच्या बाहेर पडणार असाल तर आजचे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्या... दरम्यान देशभरात मागील वर्षापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Rate) कोणताही बदल झालेल नाही, मात्र ही स्थिती आता लवकर बदलू शकते. याचे कारण असे की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज (today 22 january 2023 petrol diesel rate) यूपी आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये तेलाच्या किमतीतील बदल दिसून येत आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये तेलाच्या किमती आजही स्थिर आहेत.
यामध्ये दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.
महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Rate)
- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
वाचा: आजपासून माघ, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
घरबसल्या चेक करा नवे दर
तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.